शेगाव बुज येथील स्मशान भूमी व कब्रस्थान येथे सोलर वर चालणारी पाणीपुरवठा योजनेची केली होती मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- शेगाव बुज येथील स्मशान भूमी व कब्रस्थान येथे सोलर वर चालणारी पाणीपुरवठा योजनेची मागणी शेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय यांना केली असता ग्रामपंचायत कार्यालय यांनी मागणीकडे लक्ष देत योजना मंजुरी करण्यात आली. सदर योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन करण्यासाठी प्रहार सेवक शेरखान पठाण, पंचायत समिती सदस्य विजय आत्राम, ग्रामविकास अधिकारी तितरे साहेब, पाणीपुरवठा विभागाचे बांबोळे साहेब, प्रहार सेवक मुजू शेख, अन्सार शेख, सोहिल शेख, मोबीन भाई शेख उपस्थित होते. सदर योजना मंजूर केल्यामुळे प्रहार सेवक शेरखान पठाण यांनी ग्रामविकास अधिकारी यांचे आभार मानले