मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फतीने देण्यात आले निवेदन.
Bhairav Diwase. Sep 04, 2020
पोंभुर्णा:- भारतीय इतिहासातील समाज सुधारक लोकांच्या अग्रगण्य यादीतील प्रमुख नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. क्रांतिसूर्य, सामाजिक क्रांतिकारक, बहुजनाचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे जनक अशी त्यांची ओळख. १ जानेवारी १८४८ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यानी स्त्रीयासाठी देशतीलच नव्हे तर संपूर्ण एशिया खंडातील पहिली शाळा सुरु केली. ज्या फुले दंपत्यानी अनेक अड़चनीचा सामना करून, विरोध पुकारून पुण्यातील भिडेवाडा इथून मुलीना शिक्षणाची दारे खुली करून दिली. परंतु आज त्या भिडेवाड़ा परिसराची अवस्था अतिशय दयनीय आहे. आनि ही बाब अतिशय दुःखद असुन तमाम फुले अनुयायासाठी वेदनादायक आहे. तसेच भिडेवाडा येथे जी मुलीची पहिली शाळा सुरु केली. त्याबाबतीत जो उच्य न्यायालय खंडपीठ मुंबई इथे जे प्रकरण सुरु आहे. त्या बाबतीत शासनाने स्वतःहुन हजर राहुन ते लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे. व निती जागा लवकरात लवकर भूसंपादित करून फुलेवासीयाना न्याय द्यावा . या वास्तुस राष्ट्रीय स्मारक म्हणून म्हणून घोषित करुन ते तत्काल विकसित करावे ही मागणी शास्नाकडे नेहमी करून देखिल शासन याकडे दुर्लक्ष्य करीत आहे. म्हणून शासनाने पहिली मुलीची शाळा भिडेवाडा पुणे ही जागा भू संपादित करून लवकरात लवकर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करीत ते विकसित करावे. अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्याना तहसीलदार पोंभुर्णा मार्फत या समितीचे तालुका समन्वयक भुजंग ढोले यानी निवेदन दिले आहे. कार्यवाही न केल्यास शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आई सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर जन आंदोलन करण्यात येइल याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. आशी विनंती व इशारा या समितीच्या वतीने देण्यात आला. निवेदन देताना.
श्री. सद्गुरू ढोले जिल्हा. सचिव अखिल भा.महात्मा फुले स. प चंद्रपूर, श्री. भुजंगराव ढोले ता. समन्वयक सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती पोंभुर्णा,
श्री. रोशन गुरनुले, श्री. संजय वाढई, श्री. नलूजी गुरनुले, श्री. विकास टाकरे, छगन निकुरे, गणेश ढोले. व पदाधिकारी उपस्थित होते.