आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुरग्रस्‍तांना मदतीचा हात.

Bhairav Diwase
पाहणी दौ-यादरम्‍यान दिलेले आश्‍वासन पूर्ण.

पुरग्रस्‍तांच्‍या आरोग्‍य तपासणीनंतर धान्‍य किटचे वाटप.

भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे व डॉ.मंगेश  गुलवाडे यांची उपस्थिती.
 Bhairav Diwase.    Sep 06, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपुर:- गोसीखुर्द धरणाचे दरवाजे  उघडल्‍यानंतर भंडारा , गडचिरोली जिल्‍हयासह चंद्रपूर जिल्‍हयातील काही तालुक्‍यांना त्‍याचा फटका बसला. यात बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल, पोंभुर्णा तालुक्‍याचाही समावेश आहे . पुरग्रस्‍त भागाची पाहणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसापूर्वी केल्‍यानंतर पाहणी दौ-यादरम्‍यान पुरग्रस्‍तांना सर्वतोपरी मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले. याचवेळी त्‍यांनी आरोग्‍य तपासणी शिबीर घेण्‍याचेही जाहीर केले होते. त्‍याअनुषंगाने आज पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांव, ठाणेवासना व मुल तालुक्‍यातील कोरंबी येथे आरोग्‍य तपासणी शिबीराचे आयोजन करण्‍यात आल्‍याने ग्रामीणांचा जीव सुखावला आहे. पुरग्रस्‍तांना आ. मुनगंटीवार यांनी मदतीचा हात दिल्‍याने पाहणी दौ-यादरम्‍यान त्‍यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण झाले आहे. विशेष म्‍हणजे, आज रविवार (6 सप्‍टेंबर) ला झालेल्‍या आरोग्‍य शिबीरात भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे व जिल्‍हाध्‍यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या हस्‍ते पुरपिडीतांना धान्‍य किटचेही वितरण करण्‍यात आले.
 
काही दिवसापूर्वी गोसीखुर्दचे पाणी सोडण्‍यात आल्‍यानंतर पोंभुर्णा तालुक्‍यातील, जुनगांव, ठाणेवासना, गंगापूर (टोक), गंगापूर, देवाडा, पिपरी देशपांडे या गावांना पुराचा जबर फटका बसला तर हीच परिस्‍थीती मुल तालुक्‍यातील कोरंबी, बेंबाळ, नवेगांव, जुनासुर्ला, चांदापूर, भवराळा, बोंडाळा खुर्द, बोंडाळा बुज या गावांची झाली.   कोरंबी हे गांव 4 दिवस पाण्‍याचे वेढलेले होते. या विषयाची गंभीर दखल घेवून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण पूरग्रस्‍त क्षेत्राची पाहणी करीत नागरिकांचे सांत्‍वन करून सदैव त्‍यांच्‍या पाठिशी असल्‍याचे प्रतिपादन करीत मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले. त्‍यानुसार पोंभुर्णा जुनगांव, ठाणेवासना येथे आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. या शिबिरात 175 पुरग्रस्‍तांची तपासणी करण्‍यात आली. यावेळी वैद्यकिय अधिका-यांच्‍या चमूसोबत भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, सभापती  अल्‍का आत्राम, तालुकाध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, दिलीप मॅकलवार, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, मोहन चलाख, पांडूरंग पाल, राहूल पाल, प्रभाकर पिंपळशेंडे, अल्‍का मडावी यांच्‍या उपस्थितीत पुरग्रस्‍तांच्‍या आरोग्‍याची तपासणी प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या चमूने केली. जुनगांव व ठाणेवासना येथे आरोग्‍य तपासणीची जबाबदारी डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. परवेज शेख, डॉ. शंभरकर यांच्‍यासह प्राथमिक स्‍वास्‍थ्‍य केंद्र नवेगांव मोरे येथील संपूर्ण कर्मचारी वृंदाने सांभाळली. कोरंबी येथे सभापती चंदू मारगोनवार यांच्‍या नेतृत्‍वात घेण्‍यात आलेल्‍या शिबीरात अमोल चौधरी, दिलीप पाल, मुन्‍ना कोटंगले, त्र्यंबक चुधरी, रवि चुधरी, डॉ. कन्‍नमवार, डॉ. रामकुमार आकापल्‍लीवार, संजय येनूरकर, वाहन उराडे  यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. प्राथमिक आरोग्‍य केंद्र बेंबाळ येथील डॉ. धोंगडे  यांच्‍या नेतृत्‍वात 160 पुरग्रस्‍तांची तपासणी करण्‍यात आली. शिबीरात सहभागी झालेल्‍या गरजू रूग्‍णांना औषध वितरण करण्‍यात येवून त्‍यांची ऑक्‍सीमीटर, टेंम्‍प्रेचर गनने कोरोना संदर्भात तपासणी करण्‍यात आली. ठाणेवासना येथील आरोग्‍य शिबीरात गंगापूर टोक व गंगापूर च्‍या पुरग्रस्‍तांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावतीने धान्‍य किटचे वितरण करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी पुरग्रस्‍तांशी साधला. कोरोनाच्‍या भितीमुळे नागरिक आरोग्‍य तपासणी करण्‍यासाठी पुढे धजावत नव्‍हते. भोंगळे यांनी पुरग्रस्‍तांना आश्‍वासीत केल्‍यानंतर सर्वांनी आरोग्‍य तपासणी करून घेतली. यासोबतच त्‍यांनी इतर पुरग्रस्‍तांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे किमान चारशे धान्‍य किट पुन्हा  पाठविण्‍यात येत असल्‍याचे सांगीतले.