सुशी- चिरोली मधोमध असलेल्या अंधारी नदी पुलिया जवळील घटना.
Bhairav Diwase. Sep 04, 2020
पोंभुर्णा:- मूल-पोंभूर्णा मार्गावरील चिरोली सुशी अंधारी नदीला जुन्या बुडीत पुलियाचे जीर्णोद्धार करून काही वर्षा पूर्वी नवीन पुलियाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र सदर पुलिया अपघाताला आमंत्रण देत असून नदीचे पुलियाला योग्य वळण नसल्याने अनेकदा अपघात होत आहे.
कसरगट्टा येथील संतोष शिवराम कोसरे वय 40 वर्ष या शेतमजुराचा आपल्या दुचाकीने चिरोली कडे येत असताना आज दुपारच्या सुमारास नदीच्या पुलिया समोरील वळणावर गाडी न वळल्याने तोल जाऊन मोठा अपघात झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून गावात शोककळा पसरली आहे. त्याचे पश्चात पत्नी, 3 मुली असा आप्त परिवार आहे.
काही दिवसापूर्वी दाब गावं मक्ता येथील युवकाचा याच ठिकाणी अपघात झालेला होता तर सुशी येथील काही महिन्यांपूर्वी मोठा अपघात झालेला होता असे एक ना अनेक छोटे मोठे अपघात घडल्याचे घटना घडल्या असून संबंधित विभागणी लक्ष घालून पुलिया व रस्त्याची चौकशी करून उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.