Click Here...👇👇👇

संतोष उपरे यांचे शून्यातून उभं झालेलं कर्तुत्व.

Bhairav Diwase
1 minute read
Bhairav  Diwase.    Sep 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील बिबी गाव चंद्रपूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. शून्यातून उभी झालेली बरीच माणसं कर्तृत्व गाजवत आहेत. कर्तुत्व असलं की परिस्थिती कधीच आड येत नाही. मुळात कर्तुत्वाने मोठी होणारी माणसं कधीच कारणे सांगत बसत नाहीत. संतोष उपरे यांची अशीच गोष्ट !

साध्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात झेप घेतली. बुद्धिमत्ता ही कुणाची गहाण असणारी बाब नाही. याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उच्च शिक्षण घेतले. सध्या विदेशात *नायजेरिया* या देशात मोठ्या पदावर ते कर्तुत्वाने कार्यरत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे गावात सर्वाधिक 'पॅकेज' त्यांचेच असावे. पण त्याचा लवलेशही त्यांच्या व्यक्तिमत्वात जाणवत नाही.  गडचांदूरात *'किडझी* या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमाने त्यांनी परिसरात शैक्षणिक क्षेत्रात दमदार पाऊल टाकलंय. माणूस मोठा झाला की स्वभावात अहंकार येतो, मात्र संतोष उपरे ची गोष्ट फार निराळी आहे. या माणसात कुठल्याही अहंकाराची लक्षणे नाहीत. अतिशय शांत, संयमी, नम्रता, अभ्यासूवृत्ती हे वैशिष्ट्य गुण त्यांच्याकडून निश्चितच शिकण्यासारखे आहे. हल्ली मागे गोष्टी करणारे आणि पुढे जाणाऱ्यांचे पाय खेचणारे बरेच सापडतील. त्यातल्यात्यात सर्वसामान्य कुटुंबातला माणूस पुढे जात असताना तर असे प्रकार जास्त घडतात. 'मी शून्यातून पुढे आलो,  त्यामुळे आयुष्यात मला कुठल्याच गोष्टीचा कमीपणा वाटत नाही, शून्याचाही नाही.' हे वाक्य त्यांचं बरच काही शिकण्यासारखं आहे. संतोषभाऊच्या चेहऱ्यावरील नेहमी स्मित हास्य एका 'लढवय्याचे' असल्याचे नेहमीच जाणवते. साधा, सरळ आणि प्रत्येकाला भावणाऱ्या स्वभावामुळे त्यांच्यातील हळवा माणूस वेळोवेळी दिसतो. जमेल तसा प्रत्येकाला मदतीचा हात देत, मार्गदर्शन करत त्यांचा प्रवास हा यशोदायी होत असल्याचा फार मनोमन आनंद आहे. कोरपना तालुक्यातील असल्यामुळे सर्वाना अभिमान वाटतो.