चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी सर यांना रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशन, चंद्रपूर तर्फे मानाचा मुजरा.

Bhairav Diwase
रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशन त्यांच्याशी संपर्क केला असता पोलिस अधीक्षक सरांनी तत्काळ येऊन रक्तदान केले.
Bhairav Diwase.    Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- देशासाठी कर्त्यव्य बजावत, समाजाशी जुळून असलेले चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी सर यांना रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशन, चंद्रपूर  तर्फे मानाचा मुजरा.....
आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी बंडू गुरनुले नामक रुग्णाला A- (negative) या दुर्मिळ गटाच्या रक्ताची गरज होती, तेव्हा त्यांना  A- रक्तदाता मिळत नव्हता.
ही घटना रक्तदान महादान  निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे हकीम हुसैन भैया यांना संपर्क करून कळवण्यात आली, तेव्हा तत्काळ A- रक्तदात्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी सर यांचे रक्तगट सुद्धा A- आहे असे लक्षात आले तेव्हा त्यांच्याशी संपर्क केला असता पोलिस अधीक्षक सरांनी तत्काळ येऊन रक्तदान केले, त्यांच्या या कार्याला रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशन चा मानाचा मुजरा , आणि हार्दिक शुभेच्छा...
आणि योगायोग असा आला की या आधीही पोलीस अधीक्षक सरांनी दोन वर्षां आधी याच महिन्यात एका रुग्णासाठी रात्री  येऊन रक्तदान केले होते.