कोरपना येथे जिल्हा परिषद सिंचाई व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग स्थापन करा.

Bhairav Diwase
नागरिकांची मागणी! प्रशासकीय दृष्ट्या होईल सोयीचे.
Bhairav Diwase.    Sep 04, 2020
(संबंधित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- कोरपना येथे तालुका निर्मितीच्या २८ वर्षानंतर ही जिल्हा परिषद सिंचाई व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग ची स्थापना झाली नसल्याने सदर कार्यालय संबंधी कामासाठी राजूरा येथे जावे लागते आहे. त्यामुळे कोरपना व जिवती तालुका मिळून कोरपना या ठिकाणी स्वतंत्र उपविभाग स्थापन करण्यात यावा अशी मागणी होते आहे.
दोन्ही कार्यालय ही तालुक्‍याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. मात्र आज वर या कार्यालयाची स्थापना झाल्याने ४२ किलोमीटरवरील राजुरा येथून तिनी तालुक्याचा कारभार सांभाळला जातो आहे. त्यामुळे या कार्यालयावर सुद्धा कामाचा अतिरिक्त भार आहे. या अनुषंगाने  उपविभाग कोरपना येथे स्थापन झाल्यास तालुक्यातील नागरिकांची कामे एकाच ठिकाणी होईल. एकूण तिकडे चकरा मारण्याचे सत्र थांबून आर्थिक बचत होईल. जिवती तालुक्याला सुद्धा कोरपना अत्यंत जवळ असल्याने सोयीचे होईल. सदर कार्यालय स्थापण्यासाठी कोरपना येथील पंचायत समिती परिसरात इमारती ही उपलब्ध असल्याने कार्यालय निर्मिती दृष्टीने सुद्धा कुठलीच अडचण जाणार नाही. सिंचाई उपविभाग च्या माध्यमातून कोल्हापुरी बंधारे, धरने , लघुपाटबंधारे, सिप्लग बंधारे, जलयुक्त शिवार , धडक सिंचन योजना आदी योजनाची अंबलबजावणी करणे व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या माध्यमातून नळ योजना संबंधी तालुक्यातील कामांच्या अंमलबजावणीला सोयीचे होईल. यादृष्टीने दोन्ही उपविभागाची कोरपना येथे शासनाने तातडीने निर्मिती करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण नवले , युवा जिल्हाप्रमुख अॅड श्रीनिवास मुसळे, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत मालेकर आदीसह नागरिकांनी केली आहे.