सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश.

Bhairav Diwase
स्वाधार योजनेचे पैसे मिळणार.
Bhairav Diwase.    Sep 07, 2020
(संबंधित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- सम्यक विद्यार्थी आंदोलन हे विद्यार्थी समस्यावर काम करणारे, समता, स्वतंत्र, आणि बंधुता या तीन सूत्रावर आधारित आनी लोकशाही मुल्याचा पुरस्कार करणारे विद्यार्थी संघटन आहे. सन १९८२ साली सम्यक विद्यार्थी आंदोलनाची स्थापना झाली असुन गेली अनेक वर्ष हे संघटन समाजात विद्यार्थी प्रशनावर अवीरत काम करीत आहे. जसे की शालेय दरवाड फी, शिष्यवृति, शिक्षक भरती, युजीसी बर्खास्तिसदर्भात, एकुणच करीयर, गाइडेंस करून विदयार्थ्याना मुख्य प्रवाहात आणणे, KG to PG शिक्षण मोफत करने इत्यादि विषय घेऊन ही संघटना अतिशय प्रखरपने अन्याया विरोधात  लढा देत आहे. त्यातच अनुसीचीत जाती ,व जमातितिल विद्यार्थीसाठी अतिशय संजीवनी ठरलेली स्वाधार योजना. या योजनेमुडे अतिशय गरीब, गरजू, होतकरु,मुलाना उच्य दर्जाचे शिक्षण घेण्याचा मार्ग सुकर झाला. उच्य शिक्षण घेनेसाठी ग्रामीन भगातील गरीब विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुंवत असल्याने शहराचे ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नव्हता. परंतु स्वाधार योजनेमुडे ज्या एस. सी. ,एस.टी. विद्यार्थीला वस्तीगृहात प्रवेश मिडत नाही त्या विद्यार्थीस या योजने अंतर्गत निर्वाह भत्ता देण्यात येतो. व त्या आधारावर विद्यार्थी आपले आयुष्य घडवतो. परंतु येत्या काही डिवसा पासून हया योजनेअंतर्गत निधि न आल्याने अनेक गरीब ,वंचित, विद्यार्थी  शिक्षणापासून दूर होणार याचे गांभीर्य लक्षात घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेने आद. बालासाहेब आंबेडकर यांचे मार्ग दर्शनखाली संघटनेने महाराष्ट्रात आंदोलन उभे केले होते.त्याचा परिणाम आज शासनाने या योजनेचे ६० कोटि रुपये सर्व विभागाना वितरित केले असल्याचे महाराष्ट्राचे समाज कल्यान आयुक्त प्रवीण दराडे यानी महटले आहे. 
        एकंदरित गरीब विद्यर्थ्याला पूना एकदा उच्च शिक्षण घेता येणार आहे. परंतु यासाठी प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांचे आदेशावरुण हे आंदोलन छेडले व आज जो विजय झाला आहे त्यासाठी सम्यक विद्यार्थी संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.