जिल्हा स्तरीय स्मार्ट ग्राम समितीकडून आदर्श गाव घाटकुळ ची पाहणी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Sep 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
घाटकुळ:- पोंभुर्णा तालुक्यातील कधी काडी फारसे परीचित नसलेले घाटकूल हे गाव. परंतु मागिल काही वर्षातच या गावातील ग्रामपंचायतने जी विकासाची कामे करून गावाचा विकास साधला तो खरोखरच वाखान्याजोगा आहे.
  म्हनुणच राज्यात आदर्श गाव ठरलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ गावाची नुकतीच जिल्हा स्मार्ट ग्राम समितीकडून तपासणी करण्यात आली. जिल्यातील एकुण १५ तालुक्यातील तालुका स्तरावर प्रथम आलेल्या १५ गावाची जिल्हा स्मार्ट ग्राम स्पर्धे अंतर्गत जिल्हा परिषदेकडून मूल्यमापन करण्यात आले. 
                 या मूल्यमापन समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, विस्तार अधिकारी राईंचवार, ग्राम विकास अधिकारी अरुण वाकुड़कर यानी आदर्श गाव घाटकुळ ची जिल्हास्तरिय स्मार्ट ग्राम स्पर्धेअंतर्गत तपासणी केली. समितीने सर्व कागदपत्राची पडताळणी करून गावाची पाहनी केली. व मूल्यांकन केले. यावेडी पं. स. सदस्य विनोद देशमुख, पोंभुर्णा चे गट विकास अधिकारी साळवे, विस्तार अधिकारी कुर्ज़ेकर, सरपंच प्रिती मेदाले, सी. एम. फेलो पोहिनकर, मुकुंद हसे, विठ्ठल धंदरे, व पदाधिकारी तसेच गावकरी उपस्थित होते.