Bhairav Diwase. Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील अती दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील नायवाडा या गावी एक तरूण बेरोजगार व्यक्ती देतोय मुलांना शिक्षण देशात कोरोना महामारी मुळे २२ मार्च पासून लाॅकडाऊन करून पुर्ण पणे बंदी घातली यात शाळा बंद असल्यामुळे तरूण मुल उगाच इकडे तिकडे फिरत असताना त्याना शिक्षणाची अत्यावश्यक गरज आहे. आणि यात शाळा सुद्धा बंद असल्याने नायवाडा या गावी सुनिल राठोड यांनी २५ एप्रिल पासून सोशल डिस्टेसिंग च पालण करत रोज संध्याकाळी ६ ते ८ वा. पर्यंत मुलांना शिक्षण देतो आहे सुरवातीला जागा नसताना आपल्या राहत्या घरीच शिकवायला सुरुवात केली यात गावातील पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण देतोय कुठेतरी मोलाचं योगदान देतोय म्हणुन समाज मंदिरा समोर जागा उपलब्ध करून दिली यात ईयता पहीली ते सातविचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. नायवाडा या छोट्याशा गावात सुनील राठोड यांनी शाळा बंद असल्याची गरज विद्यार्थीना भासुदिली नाही आणि आपल्या वेळेनुसार शिकवायला सुरुवात केली. नायवाडा उपसरपंच मिराताई भिमराव राठोड, लक्ष्मण राठोड, नामदेव जाधव,