शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरून वाघाने केली गाईच्या वासराची शिकार.

Bhairav Diwase
चिमूर तालुक्यातील आंबोली येथील घटना.
Bhairav Diwase.    Sep 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- आज पहाटेच्या सुमारास मारोती जुनघरे आंबोली या शेतकऱ्याच्या गोठ्यात जाऊन वाघाने गाईच्या वासराची शिकार केली आहे.जुनघरे यांचे शेत गावालागत रस्त्याच्या केळेला आहे त्यामुळे त्यांची पाळीव जनावरे त्या गोठ्यातच राहत होती वासराच्या मागच्या बाजूने वाघाने त्याला अर्धवट खाल्ले असून त्याचा मृत्यू झाला आहे काल दुपारी आंबोली परिसरात झालेल्या पावसाने शेतात व रस्त्यात चिखल असल्याने त्यावर पंज्याच्या खुणा उमटलेल्या होत्या त्यावरून वाघ हा मोठा असल्याचे लक्षात आले.

    वाघाची पंजे मोठी असल्याने परिसरातील गावात व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे याबाबत वन विभागांनी जातीने लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळण्याची मागणी होत आहे.