भिसी येथील दोन इसम बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे आढळले पॉजिटीव्ह.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- तालुक्यातील काल ( 11 सप्टेंबर ) ला आढळलेल्या 19 रुग्णात चिमूर येथील 6, नेरी 7, कवडशी 1, तळोधी 3, नाईक मासळ 1, शेडेगाव कॅम्प 1 बाधितांचा समावेश आहे.
भिसी येथे सध्या राहत असलेल्या पण मूळ पत्ता तळोधी नाईक असलेल्या दोन व एका अन्य बाधिताचा समावेश तळोधी नाईक येथील तीन रुग्णात दाखविण्यात आला आहे. भिसी येथील दोन इसम हे नागपूर येथून लग्नाहून परतलेल्या एका पॉजिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाल्याची माहिती चिमूर तालुका आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली.