गडचांदूर शहरात कोरोनाचा पहिला बळी.
Bhairav Diwase. Sep 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर येथील भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष, गडचांदुर व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष, किराणा व्यापारी श्री. सुनील चिंतलवार, वय ५७ यांचे आज पहाटे नागपूर येथे कोरोना मुळे निधन झाले.
पाच दिवसापूर्वी सुनील चिंतलवार यांना ताप व खोकला झाला होता. त्यांनी गडचांदूर येथे उपचार केले, ताप कमी झाला. पण नंतर त्यांची तब्बेत अचानक बिघडली आणि कोरोना टेस्ट पॉजिटिव आली. त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले. तेथे बेड न मिळाल्याने व प्रकृती ढासळत असल्याने नागपुरला नेण्यात आले. परंतु त्यांना ऑक्सिजन मिळाले नाही, अखेर आज पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज संपली.
आधार न्यूज नेटवर्क परीवारा तर्फे सुनील चिंतलवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🙏🙏🙏