निवेदनाद्वारे जूनी पेंशन हक्क संघटन व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दिला इशारा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना DCPS नावाची योजना ३१ ऑक्टोबर २००५ च्या अधिसूचनेद्वारे लागू करण्यात आली.सदर योजना राज्य शासन १५ वर्ष अंमलबजावणी करतांना विविध तृट्या संघटनेने दाखवून दिले आणि लाखो रुपयांचा हिशोब न देता आता १९ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयाने राज्य सरकारने यू टर्न घेत आता राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत( NPS) वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे NPS योजनेबाबत तसेच पूर्वीची DCPS योजनेबाबत सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.या कोरोनाच्या प्रादुर्भावात NPS योजनेबाबत कार्यशाळा,मार्गदर्शन न करता सक्तीने भरवून घेत आहे त्यामुळे प्रथमतः संघटनेच्या समस्या सोडविण्यासाठी पाचारण करून समस्या सोडवाव्या अन्यथा २१ सप्टेंबरला घेराव आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलेला आहे.
निवेदनामध्ये संघटनेच्या वतीने मागण्याची परिपूर्तता झाल्यानंतर कार्यवाही करावी.शिक्षण उपसचिव यांच्या २८ जुलै २०२० च्या परिपत्रकात DCPS च्या योजनेचा हिशोब ऑगस्ट २०२० पर्यंतचा हिशोब (R१+R२+R३) मध्ये वार्षिक विवरण देण्यात यावे असे नमूद असतांना मुद्दा क्रमांक ३ घेऊन NPS ची घाईघाईने अंमलबजावणी करू नये.आजतागायत कपात न झालेल्या व अनियमित झालेला कपात,शासनहिस्सा व व्याज,मिसिंग क्रेडीत न झाल्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाने स्वीकारून आर्थिक नुकसान भरपाई द्यावे.या कार्यालयांतर्गत सदर योजनेत मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून कोणताही लाभ मिळाला नाही,अनुकंपाद्वारे नोकरी नाही एवढेच नाही तर कपात झालेली रक्कम देखील नाही त्यामुळे त्या कुटुंबाची आर्थिक हानी भरून काढून मानसिक पिळवणूक करणाऱ्या घटकांची जबाबदारी स्वीकारून योग्य कार्यवाही करावी,आंतरजिल्हा बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांची रक्कम अधांतरी आहे,DCPS अंतर्गत सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी कोठे जमा केली याबाबत मार्गदर्शन करावे,शासन निर्णय वित्त विभाग १ एप्रिल २०१९ NPS मध्ये १० टक्के वरून १४ टक्के करण्यात आले आहे या योजनेत समाविष्ट झाल्यास तो आम्हाला मिळणार का??याबाबत मार्गदर्शन करावे,NPS नोंदणी पत्रकात उल्लेख केलेल्या टर्म्स आणि कंडिशन कोणत्या आहेत?? तसेच १० ऑक्टोबर २०१४ मध्ये NPS व NSDL यांच्यात जो करार झाला त्याची प्रत संघटनेस देण्यात यावी.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी लागलेले व १०० टक्के अनुदानावर टप्प्याटप्याने यांच्यावर अभ्यासगट स्थापन झालेला आहे त्याचा अहवाल येईपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये.NPS योजना केंद्र शासनाच्या धर्तीवर असल्याने त्यांना मिळणारा अतिरिक्त लाभ फॅमिली पेंशन,ग्रॅच्युटी राज्य सरकारच्या NPS धारकांना मिळणार काय?? याचा सविस्तर खुलासा करावा वरील मागण्यांचे पूर्तता झाल्याशिवाय NPS चे CSRF फॉर्म भरण्याची सक्ती करू नये.वरील मागण्यांचे निवेदन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देऊन NPS प्रक्रिया थांबवावी अन्यथा घेराव आंदोलन करण्याचा इशारा अजय लाड सहायक प्रसासक अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुरला निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.निवेदन देतांना श्री सुधाकर अडबाले सर सरकार्यवाहक विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष जूनी पेंशन हक्क संघटना,निलेश कुमरे जिल्हासचिव जूनी पेंशन हक्क संघटन,प्रशांत खुसपुरे जिल्हा कार्याध्यक्ष,महादेव मुनावत जिल्हा संपर्क प्रमुख, भालचंद्र धांडे चंद्रपूर शहर अध्यक्ष,प्रा.अनिल डहाके,धिरज ताजने,अजय सगळाम,सचिन चिमुरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.