Top News

जेष्ठ नागरिकांना वापोरायझरसह आरोग्य किटचे वाटप.

आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार.

 कोविडग्रस्तांना वाळीत टाकू नका:- विजयराव चिताडे.
 
महानगर भाजपाचा सेवा सप्ताह.
Bhairav Diwase.    Sep 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर 
चंद्रपूर:- काळजी घेतली नाही तर, कुणाला केव्हा कोरोनाचा संसर्ग होईल सांगता येत नाही.उद्या आपणही बळी ठरू शकतो.परंतु सद्या,कोरोना झाला तर त्याच्या पूर्ण परिवाराकडे उपहासात्मक बघितले जाते.ही चिंतेची बाब आहे.त्यामुळे कोरोनामुळे होणाऱ्या कोविडग्रस्तांना वाळीत टाकू नका,असे कळकळीचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळचे सदस्य विजयराव चिताडे यांनी केले.
ते आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून,भारतीय जनता पार्टी (महानगर)च्या वतीने सेवा सप्ताह निमित्य   खेडुले कुणबी समाज भवन तुकुम येथे सोमवार (२१ सप्टेंबर)ला आयोजित जेष्ठ नागरिकांना आरोग्य किटचे वाटप कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे, महापौर राखिताई कांचर्लावार,भाजपा नेते प्रकाश धारणे,दत्तप्रसन्न महादाणी,नगरसेवक व जेष्ठ नागरिकांना सुरक्षा कवच वाटप प्रकल्पाचे संयोजक सुभाष कासंगोट्टूवार,जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे,नगरसेविका माया मांदाडे,माया उईके,शिला चव्हाण,जेष्ठ नागरिक रमेश कासुलकर,अशोक संगीडवार,प्रशांत विघ्नेश्वर,सूरज पेदूलवार आणि रामकुमार अकापेलिवार यांची उपस्थिती होती.
चिताडे म्हणाले,कोरोना विषयी बऱ्याच चर्चा व अफवा आहेत,त्यावर विश्वास ठेवू नका,तसेच मनातील भीती काढा,आरोग्याची काळजी घ्या.एकमेका साहाय्य करू,अवघे धरू सुपंथ..असे वागा.


या प्रसंगी डॉ गुलवाडे यांनी सुदृढ निरोगी आरोग्यासाठी महत्वपूर्ण सूचना करीत आर्सेनिक अलबम व वेपोरायझर देण्यामागचे कारण विशद केले.महापौर कांचर्लावार यांनी त्रास जाणवल्यास लगेच तपासणी करण्याच्या सूचना करीत,घाबरू नका असे आवाहन केले.या वेळी १३८ जेष्ठ नागरिकांचा आरोग्य किट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ज्यात वेपोरायझरसह आर्सेनिक अलबम,सॅनेटायझर ,मास्कचा समावेश असल्याचे प्रास्ताविकात सुभाष कासंगोट्टूवार यांनी जाहीर केले.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हे आयोजन सेवा भावनेतून होत आहे असे ते म्हणाले.याच वेळी त्यांनी कोरोना काळात आ मुनगंटीवार यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याचा आढावा घेतला.सर्व मान्यवरांचा आ मुनगंटीवार यांचे व्यक्तिमत्व अधोरेखित करणारे "विकासाचा कल्पवृक्ष"हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.दत्तप्रसन्न महादाणी यांनी कोरोना संकटातील अनुभव विशद करीत काळजी घेण्याचे आवाहन केले.प्रशांत विघ्नेश्वर यांनी आभार मानले.याच वेळी डॉ गुलवाडे यांचा वाढदिवसा प्रित्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यशस्वीतेसाठी बबनराव धर्मपुरीवार,आशाताई दोनाडकर,मरलीधर शिरभैय्ये,लक्ष्मणराव पतरंगे,पुरुषोत्तम सहारे,प्रज्ञा बोरगमवार,मंजुश्री कासंगोट्टूवार, धर्माजी खंगार,रमेश दादगळ, बबनराव अनमूलवार,प्रभाकर भोंग,सुधाकर बोन्दे, बंडूभाऊ भाकरे,विजय ठकरे,बबनराव मत्ते,विठ्ठलराव देशमुख आणि पुरुषोत्तम राऊत यांनी परिश्रम घेतले.यावेळी चैतन्य जेष्ठ नागरिक संघ तुकुम यांचेसह किमान ११ जेष्ठ नागरिक संघाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय राहिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने