शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे मुख्य वनसंरक्षक एन .आर. प्रविण यांना निवेदन.
चंद्रपूर जिल्हा वनविभागा जागे व्हा.
Bhairav Diwase. Sep 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात या अगोदर 27 ऑगस्टला निवेदन देऊन आंदोलन करणार अश्या प्रकारचा इशारा देण्यात आला होता. लहान मुलां/मुलीचा जीव वाघ, बिबट हल्ल्यात जीव गेला. 26 ऑगस्ट रोजी उर्जानगर येथील 5 वर्षाची मुलगी, तथा आज सावली तालुक्यातील कापसी येथील 10 वर्षाचा मुलगा मरण पावला. चंद्रपूर जिल्हा वनविभागा जागे व्हा.
आज शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे मुख्य वनसंरक्षक एन .आर. प्रविण यांना निवेदन देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, बिबट, अस्वल यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यात गुराखी, शेतकरी, लहान मुले मुली, गाई, म्हशी, बकरी, इत्यादी बळी पडत असून, चंद्रपूर जिल्हा वनविभाग निद्राधीन अवस्थेत आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच वनविभागाने आतापर्यंत अश्या हिंस्त्र पशूंना पकडण्याकरीता काय नियोजन केला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. निवेदन देण्यापूर्वीं मुख्यवनसंरक्षक कार्यलय समोर निर्देशने करण्यात आली. शरद पवार विचार मंच माहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री शशीकांत देशकर यांच्या मार्गदर्शनात, जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात, राष्ट्रवादी चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष श्री सुनील काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्देशने करण्यात आली. यावेळी शरद पवार विचार मंच जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय तुरीले, NCP मीडिया जिल्हाध्यक्ष श्री नितिन पिंपळशेंडे,प्रभाग अध्यक्ष शुभम प्रजापती, प्रशांत चिप्पावर, संतोष वानखेडे यांची उपस्थिती होती.