कोरपना येथे तालुका वैद्यकिय अधिकारी कार्यालय स्थलांतर करा. नागरिकांची मागणी

Bhairav Diwase
प्रशासकीय दृष्ट्या होईल गैरसोय दूर.

नागरिकांची कामे होणार एकाच ठिकाणी.
Bhairav Diwase. Sep 07, 2020


(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- या तालुकास्तरावरील तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय गडचांदूर येथे असल्याने प्रशासकीय दृष्ट्या कामकाज एकाच ठिकाणी होत नाही. त्यामुळे सदर कार्यालय कोरपना येथे हलविण्यात यावे अशी मागणी होते आहे.
सुरवातीला कोरपना येथे ग्रामीण रुग्णालय नसल्याने या ठिकाणी चे कार्यालय गडचांदूर येथे स्थापन करण्यात आले. तेथून कोरपना व जिवती तालुक्याचा संयुक्त कारभार पाहण्यात येतो आहे. आता कोरपना येथे ग्रामीण रुग्णालय असल्याने व जिवती तालुकयाला गडचांदूर पेक्षा कोरपना अधिक जवळ पडत असल्याने या कार्यालयाचे स्थलांतरण कोरपना या तालुकास्थळी होणे अत्यंत गरजेचे आहे. याठिकाणी या कार्यालयाचे स्थलांतरण झाल्यास प्रशासकीय कामात सुसूत्रता येऊन सर्व कामे एकाच ठिकाणी नागरिकांना करता येईल. या अनुषंगाने येथील पंचायत समिती परिसरात इमारतही उपलब्ध असल्याने कार्यालय स्थापने सोयीचे होईल. या संबंधाने वरील अडचण लक्षात घेता आरोग्य विभागाने यावर तातडीने स्थलांतर प्रक्रिया करावी अशी मागणी होते आहे.