(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री, वने व नियोजन. यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा, तसेच महिला आघाडी भाजपा तालुका चंद्रपूर (ग्रामीण) यांच्या वतीने सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून पडोली, खुटाला, साई नगर येथील विविध जातीचे झाडे लावून वृक्षा रोपण तसेच प्रभू रामचंद्र तसेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा झेंडा वंदन अशे विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला मा. नामदेव डाहुले तालुका अध्यक्ष भाजपा, मा.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू.मो. मा.विनोद खेक्ले. तसेच इतर प्रमुख लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. अन्नू ठेंगणे तालुका सचिव भाजपा, मनोज ठेंगणे व इतर कार्यकर्ते यांनी केले.