Bhairav Diwase. Sep 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- 17 सप्टेंबर 2020 रोजी मा. नरेंद्र जी मोदी यांचा वाढदवसा निमित्त गोंडपिपरी तालुक्यात भारतीय जनता पार्टी च्या वतीने विविध उपक्रम आयोजित केलेले आहे तरी गोंडपिपरी तालुक्यात तहसील कार्यालय खेड्या वरून शासकीय कामा करिता खूप व्यक्ती येतात मात्र तिथे अजूनही सेनीटाईझेर मशीन लागलेली नाही या करिता मा. नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते निलेश भाऊ संगमवार यांनी लोकनेते मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे सेनीटाईझेर मशीन ची मागणी केली असता मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी निलेश भाऊ संगमवार यांच्या शब्द राखून त्यांना सेनीटाईझेर मशीन उपलब्ध करून दिली व त्या मशीन चे 17 तारखेला लोकार्पण करावे अशे आव्हाहन पण केले
ताराबाई दुर्गे, लीलाबाई दुर्गे रा. चेक नांदगाव या निराधार लाभार्थी महिलांच्या वतीने सेनीटाईझेर मशीन चे लोकार्पण करण्यात आले
कार्यक्रमाला उपस्थित तहसीलदार सीमा गजभे, भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश संगमवार, सुहास माडूरवार, ओबीसी तालुकाध्यक्ष निलेश पुलगमकार, नगरपंचायत चे सभापती चेतन सिंह गौर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव राकेश पुन, पंचायत समिती सदस्य मनीष वासमवार, सुनील फुकट, प्रशांत येल्लेवार, अनिल झाडे, गणपती चौधरी, गणेश मेरुगवार पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.