कपडे इस्त्री करीत असताना विजेच्या स्पर्शाने झटका लागून मृत्यू.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Sep 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील पत्रु खांडकूरे (व्याहाड, वय 26) या तरुणाचा कपडे इस्त्री करीत असताना विजेच्या स्पर्शाने झटका लागून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. सदर तरुण व्यवसायाने कपडे शिवणकाम करायचा. गावातील चाळीत दुकान होते. एका ग्राहकाच्या कपड्यांना इस्तरी करित असताना ही घटना घडली. झटका लागल्यानंतर बेशुद्ध पडल्यानंतर शेजारच्या नागरिकांनी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण, जीव वाचू शकला नाही.