नांदाफाटा येथे तंबाखू , गांजा, सिगारेट, दारू खुलेआम विक्री?
जाणाऱ्या नागरिकांना रस्ता लगत असल्याने नाहक त्रस्त.
नवनियुक्त जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व नवनियुक्त पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे आवारपूर च्या दारू, गांजाच्या विक्रीकडे लक्षात देतील का?
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर दारू, तंबाखू आणि गांजाच्या विक्री खुलेआम चालू आहे. ग्रामीण, शहरातील तंबाखू, गांजा, अवैध दारूच्या विक्रित्यावर कायदेशीर कारवाई करा. तसेच विनामास्क फिरणाऱ्या व थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी. अशी मागणी येथील नागरिकांनी आधीपासून केली आहे.
संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी असताना अवैध दारूविक्रत्यांना परिसरात मोकळे रान मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. फक्त अवैध दारु विक्री त्यांना सध्यातरी सुगीचे दिवस आले आहेत. गडचांदूर पोलीस ठाण्याअंतर्गत संवेदनशील असलेल्या या नांदा नथ्थू नगरीत दारूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहेत.
येथील शोकांतिका आहे की, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत काँटरवर असलेले ही कालनितून दारू, गांजा, खरा खाण्या- पिण्यासाठी रोज आवारपूर पेट्रोल पंपाच्या येत असतात.
ग्रामपंचायतीच यांच्याकडे दुर्लक्ष का?
ग्रामपंचायतीला यामधून काही वाटा मिळत आहे का?
असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहे.
बसस्थानकावर खुलेआम विक्री सुरू आहे. काही ठिकाणी जाऊन पोलीस एक-दोन कारवाई केली. पण आता धडक कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
पोलिसांनी आता धडक कारवाई का केली नाही?
दारू विक्री खुलेआम चालू आहे पण पोलिसांना माहिती नाही का?
यांच्याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज?
या करीता संबंधित अधिकारी आणि येथील नवनियुक्त जिल्हाधिकारी अजय गुल्हाने साहेब व नवनियुक्त पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनीच परिपुर्णपणे लक्ष देवून, ही अवैध दारू विक्री, गांजाची विक्रीबंद, अन्य अमली पदार्थावर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.
जवळच असलेल्या आवारपूर, हिरापुर, कढोली, गाडेगाव या मार्गावर दारूतस्कर येत आहे. दारूमाफियांच्य वाहनांची तपासणी करावी. दारूमाफियांच्य वाहनावर पोलीस अधिकारी यांनी पाळत ठेवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे .