उद्याला विदर्भ राज्य युवा आघाडी जिवती तालुका तर्फे तहसीलदारांना देणार निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील रोडगुडा (ग्रामपंचायत मरकलमेटा) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या कापसाची नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अती मागासलेल्या भागातील अनेक लोकांचे जमीन पटटा नसल्याने मुसळधार पावसामुळे कापुस, तुर, ज्वारी, सोयाबीन अश्या पिकांची खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असुन, या गरीब शेतकऱ्यांनी काय करावे. यासाठी उद्याला विदर्भ राज्य युवा आघाडी जिवती तालुका अध्यक्ष अरविंद चव्हाण व उपाध्यक्ष निलेश राठोड सचिव विनोद पवार व सर्व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन पत्र देण्यात येणार आहे.