सन २०-२१ चा पिकपेरा सात बारा वर नोंद करण्यासाठी एसडीओ ना दिले निवेदन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Sep 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपल्या शेतीतील पीक पेरा ची नोंद करणे आवश्यक असल्याने तलाठी वर्ग सन २०-२१ मधील पीक पेरा नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप चे राजू देवतळे यांच्या नेतृत्वात एसडीओ संकपाळ यांना निवेदन देत तलाठ्यानी सात बारा वर पीक पेरा नोंद करण्याची मागणी केली 
तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा वर पीक पेरा नोंद केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंद करणे गरजेचे आहे तेव्हा शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो एसडीओ यांनी तलाठ्यांना पिकपेरा नोंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली निवेदन देत असताना राजू देवतळे सचिन फरकाडे शरद हिंगे अरुण लोहकरे विजय झाडे उपस्थित होते