(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दिनांक 28 ऑक्टोंबर 2020 ला सकाळी आठ वाजता वर्धा नदी येथे नगर परिषद राजुरा तर्फे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत वर्धा नदी मध्ये दुर्गा उत्सव समाप्तीनंतर विसर्जन करण्यात आलेले मूर्तीचे साहित्य व निर्माल्य सर्व नदीकिनाऱ्यावर पसरून असल्याने नदीचे पात्रात कचरा व घाण निर्माण झालेली होती . निर्माण झालेला कचरा हा माझी वसुंधरा जलस्त्रोत स्वच्छता मोहीम अंतर्गत आज माननीय मुख्याधिकारी श्री. विजयकुमार सरनाईक यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनात स्वच्छता मोहीम राबविली वर्धा नदी पात्र व परिसर स्वच्छ करण्यात आले.
सदर अभियानात विभाग प्रमुख विजय जांभुळकर, रवींद्र जामूनकर, संकेत नंदवन्शी, अक्षय सूर्यवंशी, आदित्य खापणे, सोनवणे सर, सुरेश पुणेकर, राजु लांडगे, तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी मिळून आज ची मोहीम यशस्वी करण्यात आली त्यामुळे नदीपात्रातील परिसर स्वच्छ झालेला आहे.