Top News

माणिकगड सिमेंट कम्पनी कडून होत असलेल्या डस्ट प्रदूषणा मुळे नागरिक हैराण.


डस्ट प्रदूषण बंद न केल्यास साईशांती नगर वासी करणार आंदोलन.
Bhairav Diwase. Oct 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर शहराचे हद्दीत मागील अंदाजे 40 वर्षापूर्वी माणिकगड सिमेंट कम्पनी उदयास आली. अनेक ठिकाणी व जवळपास असलेले अंबुजा सिमेंट आल्याने सभोलताल चे गाव दत्तक घेऊन गावाचा विकास घडवून आणला परन्तु माणिकगड सिमेंट कम्पनी ही एकमेव कम्पनी आहे की, ज्या शहरात सिमेंट उधोग आहे ते शहर दत्तक तर सोडा उलट डस्ट ,ध्वनीं प्रदूषण करून लोकांच्या जीवाशी खेळत आहे. मागील कित्येक वर्षा पासून या शहरात खास करून साईशांती नगरात फार मोठे डस्ट चे प्रदूषण होत असल्याने तेथिल नागरिकांना घराचे बाहेर निघणे कठीण झाले आहे.या डस्टा मुळे घराचे छताचा कुठल्याच उपयोग घेऊ शकत नाही.चार चाकी दोन चाकी वाहन पूर्णता डस्टाने खराब झाले आहे.या कालनीत वास्तव्य करणारे नागरिक आता
 श्वासाचा ,फुफुसाचा,डोळ्याचा, त्वचेच्या रोगाने हैराण झाले आहे.असे असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.अश्या कँपणीला पोलुशन सर्टिफिकेट कसे का दिले जाते ? असा सवाल सुद्धा आमनागरिक करीत आहे.तेव्हा साईशांती नगरातील शेकडो पुरुष महिला दि 25/10/2020 ला एकत्र येऊन मिटिंग घेतली व या कम्पनी विरुद्ध निवेदन देण्याचे ठरविले तेव्हा दि 26/10/2020 ला डस्ट प्रदूषण बंद करण्याबाबत माणिकगड सिमेंट कँपणीच्या व्यवस्थापकाला निवेदन दिले व त्याची प्रतिलिपी मा जिल्हाधिकारी,मा तहसीलदार,नगराधक्ष्य,मुख्याधिकारी यांना देण्यात आली व कायम स्वरूपी सदरचे प्रदूषण बंद करण्या बाबतचा नगर परिषदला ठराव मंजूर करून शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबतचे निवेदन मा नगराधक्ष्य तथा नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले जर माणिकगड सिमेंट कम्पनिकडून कायम स्वरूपी डस्ट प्रदूषण बंद न केल्यास साईशांती नगरवासींनी आंदोलनाचा ईसारा दिला आहे.आता ही कम्पनी काय निर्णय घेणार व नगर परिषद च्या सभेत विषय घेऊन मंजूर करतील काय ?मंजूर केल्यास शहराच्या नगराधक्ष्य तथा मुख्याधिकारी त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करतील काय ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवेदन देताना नगरसेवक अरविंद डोहे,अनंताजी रासेकर,घनश्यामजी पाचभाई,महादेवराव कळसस्कर ,रत्नाकरजी लांडे,नुतेश डाखरे, ईशवरजी आत्राम,मिन्नाथ बॉंडे,गिरीधर पानघाटे, वैभव राव आदी उपस्थित होते*.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने