याला म्हणतात बातमीचा दणका! आधार न्यूज नेटवर्क या न्युज पोर्टला प्रकाशित केलेल्या बातमी प्रशासनाने दखल घेत, वढा येथील अवैध रेती साठा जप्त.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. Oct 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- पांढरकवडा वढा मार्गावरील गावठाणा रस्त्यालगतच्या जवळ मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती साठा जमा करून ठेवण्यात आला होता.

पांढरकवडा येथील नाली बांधकामा लगतचा अवैध रेती साठा जप्त. h

आधार न्यूज नेटवर्क या न्युज पोर्टला प्रकाशित केलेल्या बातमी प्रशासनाने दखल घेत, आज बुधवारला सकाळी महसुल विभागाने जवळपास २० ब्रास रेती साठा जप्त करुन जेसीबी मशीनच्या साहाय्याने हायव्यात भरुन घुग्गुस येथील नायब तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आला आहे.


या रेती साठ्याची अंदाजे किंमत ८०, ००० हजार रुपये आहे. काही दिवसांपूर्वीच पांढरकवडा येथील अवैध रेती साठा उत्खनन अधिकारी, चंद्रपूर यांनी धाड टाकुन जप्त केला होता. काही दिवसा पासुन वढा रेतीच्या घाटांवरुन अवैध रेती तस्करी जोमाने सुरु होती. रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.