Top News

सिनेस्टाईल पाठलाग करुन युवकावर प्राणघातक हल्ला.


जुन्या वादातुन केली मारहाण.
Bhairav Diwase. Oct 28, 2020

चंद्रपूर:- आरोपी पंकज सिंग व सोनल राँबर्ट रा. घुग्गुस यांनी दुचाकीने पाठलाग करून फिर्यादी नविनकुमार सिंग रा. घुग्गुस यांची महिंद्रा एक्स यु वी ५०० चार चाकी कार ला महाकुर्ला गावाजवळ थांबवुन आरोपींनी लोखंडी राँड ने फिर्यादी च्या हाताला मारले.


 त्यामध्ये नविनकुमार यांच्या हाताला जब्बर मार लागला असून त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. आरोपीने वाहनांच्या काच फोडल्या. नविनकुमार सिंग हा युवक आपल्या वाहनाने मंगळवारला सायंकाळी दरम्यान चंद्रपूर येथुन घुग्गुस ला परत येत असतांना आरोपींनी पाठलाग करून रस्त्यावर वाहन थांबवुन जुन्या वादातुन मारहाण केली.
नवीनकुमार सिंग हा सुरक्षा एजंन्सी चालवीतो व बाऊंन्सरचा काम करतो.
तक्रारी वरुन कलम ३२६,३४१,४२७,५०४,५०६ घुग्गुस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फरार झाले आहे. पुढील तपास पो.नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सहा.पो.नि. विरसेन चहांदे करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने