भाजपातर्फे 28 ऑक्‍टोबर रोजी आधुनिक नवदुर्गा सन्‍मान सोहळयाचे आयोजन.

Bhairav Diwase
विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कामगिरी करणा-या नऊ महिलांचा होणार सन्‍मान.
Bhairav Diwase. Oct 27, 2020
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्‍हा महानगर शाखेतर्फे दिनांक 28 ऑक्‍टोबर रोजी आधुनिक नवदुर्गा सन्‍मान सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या सोहळयात विविध क्षेत्रात उल्‍लेखनिय कामगिरी करणा-या नऊ कर्तबगार महिलांना सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
दिनांक 28 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 11.00 वा. बुरडकर सभागृहात आयोजित सदर सोहळयाला प्रमुख अतिथी या नात्‍याने भाजपा महाराष्‍ट्र प्रदेश महिला मोर्चाच्‍या सरचिटणीस सौ. दिपाली मोकाशी, प्रदेश उपाध्‍यक्षा सौ. वनिता कानडे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले राहणार आहे. या कार्यक्रमाला माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ रेणुका दुधे ,उपमहापौर राहूल पावडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या सोहळयात कवयित्री प्रा. डॉ. पदमरेखा धनकर, अॅड. पारोमीता गोस्‍वामी, सौ. उषाताई बुक्‍कावार, सौ. प्राजक्‍ता भालेकर, सौ. चैताली खटी, अर्चना मानलवार, सौ. उषा मेश्राम, सौ. दिप्‍ती श्रीरामे, सौ. प्रमिला बावणे या कर्तबगार महिलांना नवदुर्गा सन्‍मानाने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
या कार्यक्रमाला महिलांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन भाजपा महिला आघाडीतर्फे करण्‍यात आले आहे.