गडचांदूर पोलिसांची कारवाई; अवैध दारू विक्री प्रकरणात गुन्हे दाखल.
कोरपना:- नांदा फाटा येथील स्वतःला आरटीआय कार्यकर्ते संबोधणारे दारूबंदी कट्टर समर्थक विविध राजकीय विषयाला घेऊन कायद्याची ची भाषा बोलणारे नांदा फाटा येथील प्रतिष्ठित व्यापारी यांना सकाळी बारा वाजता चे सुमारास गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी सट्टा घेत असताना रंगेहात अटक केली.
यापूर्वीसुद्धा खबर याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पीएसआय पाटील यांनी काळे यांच्या घराची झडती घेतली होती. मात्र महिला पोलीस सोबत नसल्यामुळे व पुरावे नष्ट केल्यामुळे अटक होऊ शकली नव्हती. मात्र गडचांदूर पोलीस हे काळे यांच्या मार्गावर होते. शेवटी गडचांदूर चे थानेदार यांच्या नेतृत्वात सापळा रचून आज त्यांना अटक करण्यात आली आहे.
मागील कारवाईत पाटील आणि काळे यांच्यात चांगलेच शाब्दिक वादंग झाल्याचीही चर्चा परिसरामध्ये सुरू होती. परंतु शेवटी उलटा चोर कोतवाल को दाटे या म्हणीप्रमाणे सत्य काय आहे. ते पोलिसांनी निष्पन्न केलं व जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व यापूर्वी त्यांच्यावर अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता काळे यांचे यांचे काय होईल याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे