चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या जिल्हा कृषी अधिकारी यांना सूचना.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्रांतील नागभीड व चिमूर तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र हे धान पिकाचे असून सर्व धान पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना महाभयंकर लागलेल्या मावा तुडतुडा व करप्या रोगाने ग्रासले आहे ८०% पेक्षा जास्त नुकसान झाले मात्र कृषी विभागाकडे जी आकडेवारी आहे ती अत्यंत कमी प्रमाणात दाखविण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होत आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रांतील सर्व पिकांचे फेरसर्वे करून झालेल्या नुकसानभरपाईची योग्य टक्केवारी दाखविण्यात यावी अशा सूचना.