पोंभुर्णा भाजपा महिला मोर्चा, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतिने मोर्चा व भव्य धरणे आंदोलन.

Bhairav Diwase
महाराष्ट्रातील आघाड़ी सरकारला धडा शिकवण्यासाठी मोर्चाद्वारे आंदोलन
          Bhairav Diwase. Oct 12, 2020



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने महाराष्ट्रात महिलावरील दिवसेंदिवस वाढते अत्याचार लक्ष्यात घेता, अजूनही सरकार महिला अत्याचाराविषयी गंभीर नाही या झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी व सोबतच विविध मागण्यासाठी पोंभुर्णा भाजपा महिला मोर्चा,भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने माजी मंत्री माननीय आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार,माननीय श्री हंसराजजी भैया अहीर माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री, माननीय श्री देवरावभाऊ भोगळे भाजपा जिला अध्यक्ष चंद्रपुर, यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील आघाड़ी सरकारला धडा शिकवण्यासाठी मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आला आहे.






भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात भव्य रॅली काढून पोंभुर्णा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाला भाजपा पदाधिकारी, महिला आघाड़ी, युवा मोर्चा आघाड़ी, जिला परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, शाखा पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्या, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होते.