गोंडपिपरी:- दूर्मिळ समजली जाणारी बोद मासोळी वर्धा नदीचा घाटावर सापडली आहे. ही मासोळी समुद्रात आणि डॕम मध्ये क्वचित सापडत असते. जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेली बोद मासोळीचे वजन दोन क्लिटंन होते.सकमूर घाटावर दोन किलो वजनाची बोद मासोळी प्रथमच सापडली आहे.
गोंडपिपरी तालुक्याला वर्धा आणि वैनगंगा नदीचे विस्तृत पात्र लाभले आहे. या नदी पात्रांनी येथिल शेती समृद्ध केली.सोबतच मासेमारी करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला वर्धा नदीचा पात्राने विभागले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीचा पात्रात अनेक प्रजातीचा मासोळ्या ,झिंगे आणि खेकळे मिळतात.येथिल नदीपात्रात मासेमारी करून अनेक कुटूंब उदर्निवाह करीत असतात.या नदी पात्रात तंबू,घोगूर या सारख्या दुर्मिळ प्रजातीचा मासोळ्या सापडत असतात.बाजारात यांना मोठी मागणी आहे.
सामान्य मासोळी पेक्षा यांचे भाव दुप्पट असते.
अनेक वर्षानंतर अतिदुर्मिळ समजली जाणारी बोद मासोळी प्रथमच सकमुर घाटावर सापडली आहे.ही मासोळी समुद्र आणि डॕम सापडत असते. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेली बोद मासोळी दोनशे किलो वजनाची होती. ही मासोळी प्रथमच गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर घाटात सापडली आहे.ही मासोळी सापडल्याने मासेमारि करणाऱ्यात आनंद बघायला मिळाला.या मासोळीला बाजारात मोठी मागणी असून चारशे ते सहाशे रूपये भाव मिळत असतो.सकमुर घाटावर सापडलेल्या बोद मासोळीचे वजन दोन किलोचे होते.