सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग आयुक्त समाजकल्याण चंद्रपुर यांचा उपक्रम.

Bhairav Diwase
उमेद अभियानातील रमाबाई स्व. सहायता समूह फुटाना यांने घेतला मिनी ट्रैक्टर चा लाभ. 

गटातील सर्व सदस्य महिलांनी मानले आ. सुधीर भाऊंचे आभार.
Bhairav Diwase. Oct 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग समाजकल्याण चंद्रपुर यांचे वतीने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात अनु. जाति व नवबौध घटकाच्या स्वय सहायता समुहाना मिनी ट्रैक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा करण्याची योजना रबाविलि गेली होती. या योजनेत फुटाना मोकासा या गावातिल रमाबाई स्व.सहायता समूहाने अर्ज केला होता. 

                    अर्ज केल्यानंतर या समुहाला ही मिनी ट्रैक्टर सन २०१९ मधे मंजूर झाली. या योजनेत लाभार्थी समुहाला १०% हिंसा स्वतःहा उभारायचा होता.परंतु ही रकम भरण्याची जबाबदारी स्वतः सुधीर भाऊ मुनगंटीवार यानी घेतली.व बचत गटातील महिलाना ट्रैक्टर मिडवून देण्याचा मार्ग सुकर केला. यातूनच सुधीर भाऊची महिला प्रति असलेली तळमळ ही प्रखरतेने दिसते. 
                                    एकुनच पाहता बचत गटाला मिनी ट्रैक्टर ची योजना मंजूर तर झाली परंतु या महिला बचत गटाचे १०% निधि स्वतः भाऊंनी पाठविल्यामुळे रमाबाई महिला बचत गट फुटाना मो. चे अध्यक्ष ममता दूधे, सचिव रुखमाबाई महोरकर, तसेच गटातील सर्व सदस्य महिलानी आ. सुधीर भाऊंचे आभार व्यक्त केले.