विवेक बोढे भाजपा शहराध्यक्ष घुग्घुस यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- चंद्रपुर येथील शशिकांत देशकर या मानसिक विकृतीच्या इसमाने बुधवारला ४ वाजता दरम्यान फेसबुकवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली.
गुरवारला रात्री घुग्घुस पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांना भाजपा शिष्टमंडळाने निवेदन देऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बद्दल समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट टाकुन समाजात तेढ निर्माण करणा-या शशिकांत देशकर या इसमावर कडक कारवाही करावी अशी मागणी केली आहे.
निवेदन देतांना घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, पंस उपसभापती निरक्षण तांड्रा, माजी ग्रापं सदस्य संजय तिवरी, साजन गोहने, युवामोर्चा अध्यक्ष अमोल थेरे, तंमुस अध्यक्ष हसन शेख, सुरेंद्र भोंगळे, बबलु सातपुते, प्रविण सोदारी, अजय आमटे, श्रीकांत सावे, आतिष मेळावार, अफरोज खान, श्रिनीवास कोत्तुर, धनराज पारखी उपस्थित होते.