सर्व्हर काही चालेना आणि विद्यार्थ्यांची परीक्षा काही होईना.
गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; विद्यार्थ्यांना नाहक त्रास.
Bhairav Diwase. Oct 05, 2020
गडचिरोली:- शासनाच्या बालीशपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने सर्व विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने परीक्षेसाठी मुदत आणि कालावधी आखून दिला. त्यानुसार विद्यापीठांनी आपले नियोजन पुर्ण करुन परिक्षा सुरळीत पार पाडणे अपेक्षित होते.
परंतु आज गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीला आला असुन आज अंतिम वर्षाच्या परिक्षा सकाळी 9 वाजता नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार होत्या. परंतु काही कारणास्तव या वेळेत मध्ये बदल करण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येत आहे की उन्हाळी 2020 च्या दिनांक 05/10/2020 रोजीचा नियोजित असलेल्या सर्व परीक्षांच्या वेळात काही तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात येत. असून शेवटी 10:30 वाजताच्या सुमारास विद्यापीठाने संकेतस्थळावर अधिसुचना प्रकाशित करून परीक्षेची वेळ बदलल्याची घोषणा केली असुन ही परिक्षा आता दुपारी 2 वाजता सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे, याला जबाबदार कोण? विध्यार्थीचा मानसिक त्रासाला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात साठले आहे.
सकाळपासून गोंडवाना विद्यापीठाचा गोंधळ सुरू असुन आज सकाळी 9:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने सुरु होणारी पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाची परिक्षा सर्व्हर खराब असल्याने तांत्रिक अडचणींचे कारण देऊन दुपारी 2:00 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
मात्र मुळातच गोंडवाना विद्यापीठाचे तंत्र बिघडले असल्याने शेवटी पुन्हा एकदा तांत्रिक कारण पुढे करून आजची परीक्षा रद्द करून पुढे घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठच्या परिक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अनिल चिताडे ह्यांनी जाहिर केले आहे.
ह्या प्रकारे आज पुन्हा एकदा गोंडवाना विद्यापीठाची लक्तरे वेशीवर टांगण्यात विद्यापीठ प्रशासन यशस्वी ठरले असल्याची चर्चा आहे.
वस्तुतः विद्यापीठाने आपले संकेतस्थळ आधीच दुरुस्त करून तसेच त्याच्या सर्व चाचण्या करून तयार ठेवणे गरजेचे असताना गोंडवाना विद्यापीठाचे सर्व्हर बंद असल्याने पुरता गोंधळ उडाला होता. केवळ 2 जिल्ह्यापुरते मर्यादित असलेले हे गोंडवाना विद्यापीठ मुठभर विद्यार्थ्यांना सुविधा देऊ शकत नसेल तर सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, गुणदान व शिक्षण ह्याचा दर्जा काय असेल ह्याचा विचारसुद्धा करणे अवघड आहे.