गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कडून अधिसूचना जाहीर.
Bhairav Diwase. Oct 05, 2020
गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची अंतिम वर्षाची परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेची वेळ 9:00 वाजता ठरवली होती. परंतु काही कारणास्तव या वेळेत मध्ये बदल करण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येत आहे की उन्हाळी 2020 च्या दिनांक 05/10/2020 रोजीचा नियोजित असलेल्या सर्व परीक्षांच्या वेळात काही तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात येत असून सदर सर्व 9 ते 10:15 पंधरा दरम्यान च्या परीक्षा दुपारी 2:00 वाजता सुरू होतील. या संबंधितांनी नोंद घ्यावी, असे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कडून अधिसूचना जाहीर केल्या आहेत.
गूगल क्रोम वरून विद्यापीठाच्या परीक्षा लिंक जी तुम्ही मॉक टेस्ट देतांना लिंक केली ती https://unigugexam.in/Home/Register यावर जाऊन मोबाईलवरील विद्यापीठाच्या एक्साम ओपन होम पेज वरील काळ्या पट्टीच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन रेषे वर क्लिक करून लॉगिन इन वर क्लिक करणे. सीट नं. व PRN नं. टाकल्यावर तुमचा रजिस्टर मेल व मो. नं. आपोआप डिस्प्ले होईल/दिसेल. कन्फार्म केल्यानंतर आपला पेपर /पेपर चे नाव डिस्पले होईल. पेपरवर क्लिक केल्यावर तुमच्या पेपरचा एक प्रश्न ओपन होईल. तो प्रश्न सोडवला की दुसरा प्रश्न येईल, त्या नंतर तसेच तिसरा, चौथा ----जितके प्रश्न असेल तितके. त्यानंतर you have competed exam असा मॅसेज आला की तुमचा पेपर सबमिट झाला असे समजावे. 75 मिनिटाचा कालावधी पेपर सोडविण्यासाठी आहे. वेळेतच पेपर सोडावा. वेळ संपली असेल तुमचा पेपर सोडवायचा बाकी राहिला तर जेवढे प्रश्न सोडविले तेवढेच स्विकारल्या जाईल. म्हणून पूर्ण प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.