दोन भावंडांनी फिर्यादीच्या घराच्या सामानाची केली तोडफोड.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- रविवारला सायंकाळी दरम्यान आरोपी विक्की मनोज सारसर (३०) व सोनु मनोज सारसर (२५) रा. शास्त्रीनगर, घुग्गुस या दोन भावंडांनी फिर्यादी रंगय्या मल्लया पुरेल्ली (६०) यांच्या घरात घुसून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत घरातील सामानाची तोडफोड केली.
फिर्यादीच्या मुला सोबत आरोपींची बहिन लग्न करुन सोबत गेल्याने संतप्त झालेल्या दोन भावंडांनी फिर्यादीच्या घराच्या सामानाची तोडफोड केली. व दुकानाची तोडफोड केली.
फिर्यादीच्या तक्रारी वरुन घुग्गुस पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ (३४) गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास सह. पो. नि. विरसेन चहांदे, बंडु मोहरे करीत आहे.