सुरज ठाकरे यांची चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.
Bhairav Diwase. Oct 26, 2020
चंद्रपूर:- जिल्ह्यामध्ये युवा नेतृत्व व कामगारांचे नेतृत्व म्हणून भरभराटीस आलेल्या सुरज ठाकरे यांनी राज्यमंत्र्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम ठोकून अमरावतीच्या आमदार रवी राणा व अमरावती जिल्ह्याच्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षांमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला व सुरज ठाकरे यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी रवी राणा यांनी दिली.
सुरज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकून दहा महिने आधीच प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये प्रवेश केला परंतु प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये सातत्याने कामे करत असताना पक्षातील जुन्या लोकांद्वारे कुरघोडीचे राजकारण व संपर्कप्रमुख मंगेश देशमुख यांचे जिल्ह्याकडे अजिबात नसलेले लक्षात जिल्ह्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष ची सुरज ठाकरे यांच्या माध्यमातून होणारी भरारी काही जिल्ह्यातील वरिष्ठ राजकारण्यांना देखील खोपली व सुरज ठाकरे यांचा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला व कालच प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख मंगेश देशमुख यांना हाताशी घेऊन सूरज ठाकरेंविरोधात पत्र काढले परंतु याची चाहूल सुरज ठाकरे यांना दोन महिने आधीच लागली होती व सुरज ठाकरे यांनी त्यांच्या कुरघोडी वरच प्रहार करत आपला स्वाभिमान वाचवून स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला.