तालुक्यातील विविध गावात कार्यकारिणी जाहीर करून दिले नियुक्तीपत्र.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदुर येथील पी दुब्लू डी विश्राम गृह येथे आपल्या संघटनेच्या विस्तारासाठी कोरपणा तालुक्यातील विविध गावातील शेतकरी मित्र मंडळींची चर्चा सत्र व तालुक्यातील प्रत्येक गावात किसान युवा क्रांती संघटनेची स्थापना करावी या हेतूने पद वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. गडचांदुर शहरात किसान युवा क्रांती संघटना कार्यकारिणी गठित करण्यात आली,व तालुक्यातील विविध गावात कार्यकारिणी जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे संचालन किसान युवा क्रांती संघटनेच्या तालुका अध्यक्ष श्रीपाद संतोष भारती यांनी केले . आपली संघटना कशा प्रकारे काम करते , काय काम करते व कुणासाठी काम करते हे सर्व त्यांनी आलेल्या सदस्यांना समजावून सांगितले .
यासोबतच पिंपळगाव, लखमापूर अंतरगाव, खिर्डी, नांदाफाटा, येथील काही समाज हितचींतकाना किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करा म्हणून पदभार देत नियुक्तीपत्र दिले, यावेळी किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष मा. श्रीपाद भारती, उपाध्यक्ष समर्थ जोगी, उपाध्यक्ष इम्रान शेख, आकाश गेडाम, प्रवीण आदे, युवराज उरकुंडे, तिरुपती पेटकर, प्रफुल मांडवकर, राहुल मुक्के, सचिन गोहोकार ,सचिन राजूरकर ,निलेश चौथाले,दिनेश बोधाळे,अनिकेत बोभातें वैभव बोभाटे,सुरज गेडाम सागर केलझरकर इत्यादी उपस्थित होते. उपस्थित व नवनियुक्त पदाधिकारी यांनी तन मन व धनाने जमेल तशी आपल्या किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीन असे मत व्यक्त केले.
लवकरच पुन्हा उर्वरित कोरपना जिवती व राजुरा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये किसान युवा क्रांती संघटनेचा विस्तार करून तालुक्यातील शेतकरीराजाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू , असे मत तालुका अध्यक्ष श्रीपाद भारती व उपाध्यक्ष समर्थ जोगी आणि इम्रान शेख यांनी व्यक्त केले.