(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील साखरी गावातील ग्रामवासीयांना माजी पंचायत समिती सभापती राकेश गड्डमवार यांनी आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून गावातीलच तीन हातपंप दुरुस्ती करून दिले. प्रत्येक गावात 2/4 तरी मात्तबर मंडळी असते. ज्यांचा गावात नेहमी बोलबाला असतो. सावली तालुक्यातील साखरी गावात सुध्या असेच एक ग्रामस्थ आहेत. ते म्हणजे राकेशभाऊ गड्डमवार यांचा काल दि. 11 ला जन्मदिवस होता. त्यांचा जन्मदिवस म्हणजे एक गावातील लोकांसाठी सणच असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्या त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता परंतु राकेश भाऊ यांनी आपला वाढदिवस हा मोठ्या थाटामाटात न करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर दरवर्षी जेवढा वाढदिवसावर खर्च होत होता त्यापेक्षा जास्त खर्च करण्याचा विचार करून त्यांनी गावातील तीन हातपंप दुरुस्ती करण्याचे ठरवले. यानुसार राकेश भाऊ यांनी आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून गावातील बंद अवस्थेत असलेले हातपंप आपल्या स्वखर्चाने दुरुस्त करून दिले. तीन हातपंप दुरुस्ती करण्यासाठी जवळपास 16000 हजार रुपये करच आला. परंतु त्यांनी खर्चाचा विचार न करता गावातील महिलांची होणारी पायपीट कशी थांबवता येईल या एकाच विचाराने त्यांनी आपला वाढदिवसाचा खर्च काहीतरी चांगल्या कामात लावणे पसंद केले. त्यांचे हे अनोखे काम पाहून गाववासीय सुध्या आश्चर्यचकित झाले. त्यांच्या या अनोख्या भेटीची पूर्ण गाव प्रशंसा करीत आहेत. केवळ वाढदिवस आहे म्हणूनच नाही तर आजपर्यंत त्यांनी नेहमी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सारखा लोकनेता सावली तालुक्यात तरी होणे दुरापास्त दिसत आहे अशी मते लोक बोलून दाखवीत आहेत. अशा या लोकनेत्याला अनेकांनी आशीर्वाद दिले तर अनेक जण त्यांना नेहमी साथ देण्याचे ठरविले आहे.