घुग्घुस पोलिसांच्या अकार्यक्षमते मुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
Bhairav Diwase. Oct 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- घुग्घुस येथील नाजमा बेगम सिद्दीकी हि सकाळी ७ वाजात घरासमोर कपडे धुत असतांना गांजा विक्रेता नौशाद कुरेशी रा. बँक ऑफ इंडिया मागे भंगार मोहल्ला यांने शुल्लक कारणावरुन भांडण करुन मारहाण करीत महिलेचा गळा दाबला व महिलेच्या अल्पवयीन मुलीस ही झापड मारली व कपडे धुण्याच्या भांड्याची तोडफोड केली.
घुग्घुस पोलिस स्टेशन गाठुन महिलेने तक्रार दाखल केली. घुग्घुस पोलीसांनी मात्र अदखपात्र ३२३,५०४,५०६ गुन्ह्याची नोंद केली आहे.
घुग्घुस येथे नौशाद कुरेशी हा मागील अनेक वर्षापासून गांजा विक्री करतो. नौशाद कुरेशी वर कोळसा तस्करी व भंगार चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहे.
नौशाद कुरेशी हा गुंडप्रव्रूत्तीचा असल्याने त्याची भंगार मोहल्यात मोठी दहशत आहे. १० ग्राम एका पुढीची किंमत १५० रुपये प्रमाणे विक्री केली जाते. गांज्याची विक्री जोमात सुरू असल्याने या गुंडाचे मनोधैर्य वाढले आहे महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे.
यापुर्वी घुग्घुस येथील गांजा विक्रीच्या बातम्या वर्तमानपत्रातुन प्रकाशित करण्यात आल्या परंतु घुग्घुसचे पोलीस अधिकारी व गुन्हे शाखेचे पथकाने कोणतीच कारवाही न केल्याने आज या महिलेस अमानुष रित्या मारहाण करण्यात आली.