श्री. शशांक नामेवार यांना गोंडवाना विद्यापीठाचा महाविद्यालयीन उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर चे मुख्य लिपिक श्री.शशांक शंकरराव नामेवार यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार(संलग्नित महाविद्यालये) प्राप्त झाला असून २ ऑक्टोंबर रोजी संपन्न झालेल्या विद्यापीठाच्या ९व्या वर्धापन दिनी आयोजित पुरस्कार वितरण सोहळा मध्ये श्री शशांक शंकरराव नामेवार यांना गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी आणि कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांचे हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे श्री शशांक नामेवार हे महाविद्यालयातील उपक्रमशील आणि क्रियाशील लिपिक असून अनेक उपक्रमात आणि कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. महाविद्यालयातील विविध विस्तार कार्य एन. एस.एस तसेच समाजोपयोगी कार्यामध्ये श्री नामेवार यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांचा अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची निकटचा संबंध असून अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले, तुळशीरामजी पुंजेकर, नामदेवराव बाबडे, नोगराजजी मंगरूळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह , डॉ. दुधगवळी, डॉ.बिडवाईक,डॉ.गोरे, डॉ.बेलोरकर, डॉ.कु.मसराम,डॉ.सिह, प्रा.करंबे, नळे, उरकुडे,भोयर, बुऱ्हाण, टेकाम, पोहाणे, चांदेकर, पांडे, कुलमेथे इ. अभिनंदन केले .