गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी.....

Bhairav Diwase
0
Bhairav Diwase. Oct 23, 2020
चंद्रपूर/गडचिरोली:- गडचिरोली-चंद्रपूर या महामार्गावर असलेल्या सावली तालुक्यातील शेवटच टोक आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीच्या मोठया पुलावरून प्रेमीयुगलांनी अचानक वैनगंगा नदीत उडी घेतली आहे. हे प्रेमीयुगल वैनगंगा नदीच्या पुला वर दोन प्रेम युगल बराच वेळ गप्पा गोष्टी करीत असता अचानकपणे दोघेही प्रेमी आपली बिना नंबरची स्कुटी गाडी पुलावर उभी ठेऊन नदीत उडी घेतली. ही घटना आज सकाळची ०९:०० च्या दरम्यान घडली असून, अनेकाना ही घटना डोळ्या समोर पाहली असावी. चंद्रपूर- गडचिरोली मुख्य हायवे असल्याने प्रेमयुगल जोड़ीला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली असून पात्रात शोध मोहीम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघेही गडचिरोली जिल्हयातील असून गडचिरोली वरून आले असल्याची माहिती असून आत्महत्याचे कारण कळले नाही. 

हेही वाचा:- अखेर 32 तासानंतर मुलाचा मृतदेह सापडला, तर मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरू. 


१:०० वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुलाच नाव प्रतीक किशोर गिरडकर वय अंदाजे 18 वर्ष आणि मुलीचे नाव काजल अरविंद नागोसे वय अंदाजे 16 वर्ष आहे. दोघेही रामनगर गडचिरोली येथील रहिवासी आहेत.

या प्रेमी युगलानी इतक्या टोकाची भुमीका का घेतली हा शोध विषय आहे. पोलीस रेस्क्यू करत असुन वृत्त लिहेपर्यंत या प्रेमी युगलांचा शोध लागलेला नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)