Top News

अखेर 32 तासानंतर मुलाचा मृतदेह सापडला, तर मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरू.

Bhairav Diwase. Oct 24, 2020
चंद्रपूर/गडचिरोली:- गडचिरोली-चंद्रपूर या महामार्गावर असलेल्या सावली तालुक्यातील शेवटच टोक आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीच्या मोठया पुलावरून प्रेमीयुगलांनी अचानक वैनगंगा नदीत उडी घेतली आहे. हे प्रेमीयुगल वैनगंगा नदीच्या पुला वर दोन प्रेम युगल बराच वेळ गप्पा गोष्टी करीत असता अचानकपणे दोघेही प्रेमी आपली बिना नंबरची स्कुटी गाडी पुलावर उभी ठेऊन नदीत उडी घेतली. 


हेही वाचा:- गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी.....

          ही घटना काल सकाळची ०९:०० च्या दरम्यान घडली असून, मुलाच नाव प्रतीक किशोर गिरडकर वय अंदाजे 18 वर्ष आणि मुलीचे नाव काजल अरविंद नागोसे वय अंदाजे 16 वर्ष आहे. दोघेही रामनगर गडचिरोली येथील रहिवासी आहेत.

       या प्रेमी युगलानी इतक्या टोकाची भुमीका का घेतली हा शोध विषय आहे. काल पासूनच पोलीसांनी शोध मोहिम सुरू केली. अखेर 32 तासानंतर कुनघाडा नवेगाव रैयतवारी घाटा जवळ मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर मुलीच्या मृतदेह अजून सापडला नसून शोध मोहिम सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने