Bhairav Diwase. Oct 27, 2020
चंद्रपूर:- पोलीस स्टेशन हददीतील कन्नमवार वार्ड येथील कुख्यात आरोपी अंकुश ग्याणसिंग वर्मा वय ३२ यास उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे शिफारशी वरून उपविभागीय दंडाधिकारी बल्लारपुर यांनी सहा जिल्हयातुन दोन वर्षासाठी तडिपार केले आहे.
सदर आरोपी अंकुश वर्मा हा गुंड प्रवृत्तीचा असुन त्यावर जिल्हयात दारूविषयी १२ गुन्हे आणि चोरी, दरोडा, खुण, मारामारी असे शरीराविषयी व मालमत्तेविषयी ५ गुन्हे असे एकुण १७ गुन्हे पोलीस स्टेशन बल्लारशाह, रामनगर, नागभिड, अहेरी जि. गडचिरोली येथे दाखल आहे. तसेच सदर नमुद आरोपीवर मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ९३ आणि फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ अन्वये एकुण ४ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नमुद आरोपी यास वारंवार संधी देउनही त्याच्या वर्तनामध्ये कोणतीही सुधारणा दिसुन येत नसल्याने त्याच्या या वर्तनामुळे आजुबाजुच्या परिसरामध्ये दहशत निर्माण होउ लागली. आणि त्याच्या विरोधात कोणी तकार केल्यास तो त्यास मारण्याची धमकी देत होता. त्याचे कडुन भविष्यात पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडुन सामाजिक शांतता भंग होउ नये म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांनी चौकशीअंती अंकुश वर्मा यास तडीपार करण्याची शिफारस केली आहे.
अंकुश वर्मा ला बाजु मांडण्यासाठी संधी देवुन त्याचे म्हणने ऐकुन घेतल्यानंतर त्याचेवर तडीपारीची कार्यवाही करण्यात आली. त्याला चंद्रपुर, गडचिरोली, वर्धा (दारूबंदी असलेले जिल्हे) नागपुर, यवतमाळ, भंडारा अशा ६ जिल्ह्यातुन तडीपार करण्यात आले आहे. यापुढेही अशा अटट्ल गुन्हेगारावर कार्यवाही होणार असुन हया मोठया कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा श्री. स्वप्निल जाधव यांनी केली.