Bhairav Diwase. Oct 27, 2020
ब्रम्हपुरी:- एका अज्ञात इसमाच्या दुचाकीवर बसून जात असतांना दुचाकीवरून खाली पडल्याने महीलेचा मृत्यू झाल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी-गायडोंगरी मार्गावर आज दि. २७ आँक्टोंबरला सकाळी १० वाजता च्या सुमारास घडली.
यामध्ये मृत झालेल्या महीलेचे नाव बायजाबाई आत्राम (वय ७२) रा. गायडोंगरी असे आहे.
सविस्तर माहिती नूसार, मेंडकी येथे आठवडी बाजार असल्याने सदर महीला ही बाजारातुन जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या गायडोंगरी येथील राहत्या घरुन सकाळी १० च्या सुमारास पायी निघाली होती. गायडोंगरी वरुन काही अंतरावर गेल्यानंतर वाटेत एक अज्ञात दुचाकीस्वार एकटाच दुचाकीने जात होता. तेव्हा त्या दुचाकीस्वाराला सदर वृद्ध महीला पायी जातांना दिसली. तेव्हा त्याने माणुसकीच्या भावनेने महीलेला दुचाकीवर बसवले. परंतु काही अंतरावर गेल्यानंतर सदर महीला दुचाकीवरुन खाली पडुन मृत पावली.