(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- 24/10/2020 रोजी फुटाणा येथे मा देवरावदादा भोंगळे (माजी अध्यक्ष जि.प.चंद्रपूर तथा जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर) यांच्या हस्ते अंगणवाडी चे व जि प शाळेच्या वर्गखोली चे उदघाटन पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प. स सभापती कु. अल्काताई आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार पं. स सदस्य विनोद देशमुख, पं. स. सदस्य गंगाधर मडावी, भाजपा युवा नेता नैलेश चिंचोलकर, भाजयुमो ता अध्यक्ष अजय मस्के, फुटाणा सरपंच सारिकाताई ओदेलवार,उपसरपंच किशोर अर्जुनकर, ग्राप सदस्य विनोद ओदेलवार, रवी तेलसे, वैशालीताई रामटेके, वर्षाताई पुडके. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू अर्जुनकर, उपाध्यक्ष पपिताताई नागापुरे तसेच सर्व सन्माननीय सदस्य , मुख्याध्यापक साठे सर इतर सर्व शिक्षक वृंद गावातील प्रतिष्टीत नागरिक व गावकरी उपस्थित होते.
यावेळी फुटाणा ग्रा.प. कमेटी चा कार्यकाळ संपला असल्यामुळे त्यांचा मा देवराव दादा भोंगळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.