ओबीसी जनगणना सायकल यात्रेचे ओबीसी समन्वय समिती राजुरा तर्फे स्वागत.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी प्रा.अनिल डहाके यांनी ओबीसी जनगणना सायकल यात्रा काढली ते समाजात कुतूहलाचा विषय झाला आहे.प्रा.अनिल डहाके हे शिक्षकी पेशा तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव या पदावर कार्यरत असून त्यांना सामाजिक कामाची प्रचंड आवड आहे.ते सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका घेऊन काम करतात.
            16 ऑक्टोबर 2020 ला पत्नीचा(स्मिता)वाढदिवस ते 12 नोव्हेंबर2020 ला मुलाचा (सिद्धांत)वाढदिवस असा 28 दिवसांचा प्रवास सायकलवर करून जिल्हाभर ओबीसी जनगणना झाली पाहिजे यासाठी प्रबोधन करण्याचे ठरवून पत्नी व मुलाला अभिनव भेट देत आहे.
                    त्यांनी आपल्या सायकल पुढे"भिर भिरत्या ओबीसी पाखरांनो एका घरट्यात या रे अपुरे ते स्वप्न 52%ओबीसी जातनिहाय जनगणनेच तुम्ही साकार करा रे"अशा आशयाचे फलक लावले आहे.सोबतच घर तिथे पाटी असा उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.ते सोबत ओबीसी जनगणना करा अशा आशयाच्या पाट्या घेऊन फिरतातात व त्या वाटप करतात.
              दहाव्या दिवशी चंद्रपूर, नांदगाव, विसापूर, बल्लारपूर, राजुरा असा प्रवास केला राजुरा येथे ओबीसी समन्वय समिती, राजुरा तर्फे ओबीसी जनगणना सायकल यात्रेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ओबीसी जनगणना सायकल यात्रेत सुनील वडस्कर, पाऊणकर साहेब सोबत होते.
                    या यात्रेचे स्वागत करण्यासाठी राजुरा नगर अध्यक्ष अरुण धोटे, माजी पंचायत समिती सभापती कुंदा जेणेकर ओबीसी समन्वय समिती अध्यक्ष उत्पल गोरे, ओबीसी समन्वय समिति महासचिव सूरज गव्हाणे , समिति चे सल्लागार दिनेश पारखी,केतन जुनघरे,संतोष देरकर, रितिक बुटले, प्रणव बोबडे, निलेश बोन्सुले,अंकुश मस्की,महेश राठोड, सुभाष अडवे,साईनाथ परसुटकर, स्वप्नील बाजूजवर मुस्लिम समिती चे इर्शाद शेख , झाकिर हुसेन, असिफ सयद, रियाज शेख व ओबीसी समन्वय समितीचे इतर सदस्य कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्पल गोरे तर सूत्रसंचालन केतन जूनघरे व आभार सुरज गव्हाने यांनि केले.