(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा पंचायत समितीच्या उपसभापती सौ. ज्योतीताई बुरांडे यांनी डोंगरहळदी माल येथील आशा वर्कर आणि अंगणवाडी मदतनीस यांनी कोरोना काळात काम केल्याबद्दल त्यांना नवरात्र च्या पावन पर्वावर भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
लाॅकडाऊन मध्ये कोरोना महामरीच्या काळात देशावर कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवत असतांना अशा कठीण परिस्थितीत कोविड १९ या लढ्यात आरोग्य विभाग अंतर्गत गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा वर्कर आणि अंगणवाडी मदतनीस यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोना महामारीच्या काळात आशा वर्कर यांचा सिहांचा वाटा असून या काळामध्ये कठीण प्रसंगात जबाबदारी ने अतुलनीय सेवाकार्य केलेले आहेत. या प्रसंगी श्री. जनार्धन लेनगुरे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.