(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आदरणीय लोकनेते अर्थ, नियोजन वनमंत्री तथा आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार संकल्पनेतून केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा चे कार्यकर्ते श्री. अनुप श्रीकोंडावार व श्री. सुरज नैताम यांनी पोंभुर्णा येथील नगर पंचायत च्या सफाई कामगारांना विजयादशमीच्या पावन पर्वावर शेफ्टी किट वाटप करण्यात आले.
पोंभुर्णा नगर पंचायत मध्ये कित्येक दिवसापासून सफाई कामगार पोंभुर्णा शहरात स्वच्छतेचे काम करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात नगरपंचायत चे सफाई कामगार स्वच्छतेचे काम करताना ते सोयीसुविधा नसल्याने सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात येईल या हेतूने नगर पंचायत च्या सफाई कामगारांचे आरोग्य सुदृढ असावे या उद्देशाने श्री. राहुल संतोषवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजयादशमीच्या पावन पर्वावर सेफ्टी किट वाटप करण्यात आले. नगर पंचायत च्या सर्व सफाई कामगारांनी राहुल संतोषवार यांचे आभार मानले. यावेळी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.